Corona Update: मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने; कोरोनाबाधितांच्या आकड्याने २ महिन्यांचा रेकॉर्ड मोडला

Corona Update: मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने; कोरोनाबाधितांच्या आकड्याने २ महिन्यांचा रेकॉर्ड मोडला

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येने गेल्या दोन महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एका दिवसात मुंबईत कोरोनाबाधितांचे प्रमाण सातशेवर गेले आहे.

आज आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या २४ तासांत ७२१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १५ हजार ७५१वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ११ हजार ४२८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. गेल्या महिन्यांच्या तुलनेत पहिल्यांदाच मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या सातशे पार झाली आहे.

मात्र आज आढळलेल्या ७२१ रुग्णांपैकी  ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही आहेत. त्यामुळे रुग्णालयावर जास्त ताण नाही आहे. बरेच रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. सध्या मुंबईत वाढलेल्या ९८ टक्के कोरोनाबाधित केसेस या हायरारकी इमारतीच्या परिसरातील आहेत. दाटीवाटीच्या भागातून, झोपडपट्टीच्या भागातून जास्त केसेस येत नाही आहेत. सध्या मुंबईत चाचण्याचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे. पण मुंबईकर सध्या हलगर्जी पणाने वावरत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे, अशा नियमांचे पालन करताना दिसत नाही आहेत. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना लॉकडाऊनचा इशारा देखील दिला आहे. त्या म्हणाल्या की, ‘आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल.’


हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यात कोरोनाबाधितांची वाढ; २४ तासांत आढळले ४,७८७ नवे रुग्ण


 

First Published on: February 17, 2021 8:20 PM
Exit mobile version