Corona: नागरिकांच्या सेवेत नव्या ८५ रुग्णवाहिका; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Corona: नागरिकांच्या सेवेत नव्या ८५ रुग्णवाहिका; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व फंडातून (सीएसआर) मुंबई महानगरपालिकेला ५५ रुग्णवाहिका देण्यात येणार असून त्यातील बारा रुग्णवाहिकांची चावी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे वांद्रे-कुर्ला संकुल येथे आज, १४ जून २०२० रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आल्या आहेत. तब्बल ८५ रूग्णवाहिका नागरीकांच्या सेवेत येणार असून यातील पहिल्या टप्प्यांमधील २४ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ५५ रूग्णवाहिका सामाजिक दायित्व फंडातून (सीएसआर) मुंबई महानगरपालिकेला देण्यात येत आहेत. यातील १२ रूग्णवाहिका आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानेदेखील मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी ३० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनतर्फे या रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जात आहेत. यापैकी ५ रूग्णवाहिका या आयसीयू व व्हेंटिलेटरने सुसज्ज आहे. तसेच पुढच्या टप्प्यात ग्रामीण व शहरी भागात रूग्णवाहिका देण्यात येणार आहे.

हेही वाचा –

ठरलं! उद्या शाळा सुरू होणार नाहीत; आमदार कपिल पाटील यांनी केला संभ्रम दूर

First Published on: June 14, 2020 10:59 PM
Exit mobile version