९२ वर्षीय आजीला त्रास देणाऱ्या नातवला न्यायालयाने ठोठावला दंड

९२ वर्षीय आजीला त्रास देणाऱ्या नातवला न्यायालयाने ठोठावला दंड

प्रातिनिधिक फोटो

वरळी परिसरात रहाणाऱ्या ९२ वर्षीय आजीला मानसिक त्रास दिल्यामुळे न्यायालयाने तीच्या नातवाला आणि त्याच्या पत्नीवर दंडात्मक कारवाई केली आहे. घरगुती हिंसेच्या कलमा अंतर्गत ५० हजार रुपयांची भरपाई या पीडित आजीला केली जाईल. मागील अनेक दिवसांपासून या आजीचा नातू तीला वृद्धाश्रमात ठेवण्याची धमकी देत होता. यामुळे मानसिक तणावात असलेल्या आजीने अखेर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने खटल्याचा निकाल जरी आजींच्या बाजूने दिला असला तरीही नातवला घरा बाहेर काण्याची मागणी फेटाळली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये पीडित आजींनी नातवा विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

नातसूनेकडून अपमान
आजींचे पतींचे निधन २५ जून १९४९ रोजी झाले. पीडित आजींच्या मुलाला एक मुलगी आणि मुलगा आहे. या मुलाचे लग्न नोव्हेंबर २०१० रोजी ला झाले. आजींनी केलेल्या आरोपानुसार लग्न झाल्यानंतर नातसून त्यांच ऐकत नव्हती व नातवला त्यांच्या विरोधात भडकवत होती. नातसून अपमान करत असल्याने सर्व कुटुंबीयांनी मिटींग घेऊन हे प्रकरण थांबवायचा प्रयत्न केला होता मात्र तरीही नातसूनेने आजीला त्रास देणे चालूच ठेवले. आजींचा मुलगा आणि सून गावाला गेले असता त्यांच्या नातसूनेद्वारे त्यांना खराब अन्न दिल्या गेले. आजीने याचा विरोध केल्यावर तीने पुन्हा त्यांना अपमानीत केले. फिरण्यासाठी जात असताना नात सून तीच्या मुलीला याच आजींकडे सोडून जाते.

मानसिक त्रास होत असल्याचे पूराव्यांनी सिद्ध
वयामुळे या आजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी आपल्या मुलाकडे सर्व पुरावे दिले. हा खटला चालवण्याची पॉवर ऑफ अॅटर्नी आजींनी आपल्या मुलाला दिली होती. न्यायालयाने या पुराव्यांच्या आधारावर दंड ठोठावला आहे. “सादर करण्यात आलेल्या पुराव्यावरुन ९२ वर्षीय आजींसोबत घरगुती हिंसा झाल्याचे सिद्ध झाले आहे. नातसूनेकडून आजींना अनेकदा धमकी आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. त्यांच्या वयावरुन त्यांचा अनेकदा अपमान करण्यात आल्याने हा दंड ठोठावण्यात येत आहे.” असे महानगर दंडाधिकारी म्हणाले.

First Published on: June 28, 2018 5:00 PM
Exit mobile version