Video : ‘या’ इमारतीत रहिवाश्यांना रहावे लागतेय जीव मुठीत घेऊन

Video : ‘या’ इमारतीत रहिवाश्यांना रहावे लागतेय जीव मुठीत घेऊन

चुनाभट्टीतील इमारत

मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींची कमतरता नाही. किती तरी इमारती या १०० वर्ष जुन्या झालेल्या आहेत. मात्र असे असतानाही तेथील रहिवासी या इमारती सोडून जाण्यास तयार नाही. परिणामी, तुफान पावसात तडे गेलेल्या या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि नाहक अनेक निष्पापांचा जीव त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जातो. अशाच एका धोकादायक इमारतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चुनाभट्टीतील या ८० वर्ष जुन्या ४ मजली इमारतीतील काही भाग तुडला असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या घरापर्यंत ये-जा करण्यासाठी त्यांना रस्सीचा आधारदेखील घ्यावा लागत आहे. या व्हिडिओमधील इमारत ही चुनाभट्टीमधील असून ही इमारत न्याय प्रविष्ट आहे. अशा प्रकारच्या अनेक इमारती टाटानगर आणि चुनाभट्टीमध्ये असल्याचे समजते.

गिरणी कामगारांचे वास्तव्य 

या इमारतीत गिरणी कामगार राहत असून साधारण १२३ कुटुंब सध्या येथे वास्तव करत आहेत. यापूर्वी २५० रहिवासी येथे राहत होते. मात्र काहींनी घरे भाड्याने दिली असून काही लोकं सोडून गेलेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने या इमारतीची वीज आणि पाणी बंद केले होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येथील इमारतींच्या पुनर्बांधणीचा वाद कोर्टात गेला असून यामुळे इमारतींची कामे रखडील आहेत. त्यामुळे या संबंधी न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत सरकारने यांना तात्पुरता निवारा द्यावा, असे आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटले आहे.

First Published on: July 29, 2019 4:19 PM
Exit mobile version