धक्कादायक! विरारमध्ये कचराकुंडीत सापडले नवजात स्त्री जातीचे जीवंत बाळ

धक्कादायक! विरारमध्ये कचराकुंडीत सापडले नवजात स्त्री जातीचे जीवंत बाळ

नवजात बालक

विरारमध्ये कचराकुंडीत फेकलेले नवजात स्त्री जातीचे जीवंत बाळ सापडले आहे. विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी ते नारंगी फाटक या बायपास रस्त्यावरील कचरा कुंडीत अज्ञात व्यक्तीने एका गोणीत नवजात बाळ भरून फेकून दिले होते. आज, दुपारी अडीचच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने तिथे बघ्याची गर्दी जमली होती. पण कोणीही त्या बाळाला उचलले नाही. पण बघ्याची गर्दी पाहून थांबलेल्या स्थानिल स्वाती सोलापूरकर आणि सुनील खानोलकर या दोघांनी तात्काळ बाळाला उचलून विरारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आता बाळाची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

First Published on: October 2, 2019 9:31 PM
Exit mobile version