Corona: रक्त तुटवड्यासाठी नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केले रक्तदान

Corona: रक्त तुटवड्यासाठी नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केले रक्तदान

डॉक्टरांनी केले रक्तदान

कोरोना संसर्गाच्या भीतीतून नियमित रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, भविष्यातील रक्ताची निकड लक्षात घेऊन मुंबईच्या नायर हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांनी स्वत: पुढाकार घेऊन रक्तदान केले आहे. लॉकडाऊनच्या काळात गर्दीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सुरक्षित अंतर ठेवूनच डॉक्टरांनी हे रक्तदान केले गेले. या रक्तदान मोहिमेत १०२ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. एकूण ६६ रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात डॉक्टरांना यश आल्याची माहिती नायर हाॅस्पिटलचे मार्ड अध्यक्ष डॉ. सतिश तांदळे यांनी दिली आहे.

डॉक्टरांनी केले रक्तदान

तुम्ही कधी घेणार पुढाकार?

मुंबईच्या हाॅस्पिटलमध्ये आता काही दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हा तुटवडा वाढू नये यासाठी प्रयत्न करुन रक्तदानासाठी बाहेर पडणे गरजेचे आहेच. पण कोरोनाला हरवण्यासाठीही प्रयत्न करणे महत्वाचे आहे.

राज्यात कोरोनाचे २२० रुग्ण

राज्यात कोरोनाचा आकडा जीवघेणा ठरत असून आतापर्यंत राज्यात १० जणांच्या मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. तर, सोमवारी आणखी कोरोनाच्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे आहेत, तर ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे, तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा समावेश आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही.

हेही वाचा –

Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला फक्त अग्नी; दफनविधी होणार नाही

First Published on: March 30, 2020 9:47 PM
Exit mobile version