स्वतःच्या बचावासाठी तरुणीची धावत्या रिक्षातून उडी

स्वतःच्या बचावासाठी तरुणीची धावत्या रिक्षातून उडी

तरुणीने रिक्षातून मारली उडी

विनयभंग करू पाहणार्‍या रिक्षाचालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना वसईत घडली आहे. यात तरुणी जखमी झाली असून पोलिसांनी पळून गेलेल्या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे.
ही घटना बुधवारी रात्री वसई पश्चिमेला घडली. वसई कोळीवाडा येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी बोईसर येथून कामावरून परतून घरी जात होती. घरी जाण्यासाठी ती इकराम उल हक याच्या रिक्षात बसली.

रात्रीची वेळ असल्याने एकटीच तरुणी पाहून रिक्षाचालकाने विनयभंगाचा प्रयत्न केला. त्याने रिक्षा वेगात चालवून तिचा विनयभंग करण्याचा डाव रचला होता. मात्र, पिडीत तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने रिक्षा थांबवण्यास सांगितली. पण, इकरामने वेग वाढवून तिला धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. तरुणीने उडी मारल्यानंतर रिक्षा चालक पसार झाला. पिडीत तरुणीचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. रिक्षा चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक केली.

First Published on: November 30, 2019 3:30 AM
Exit mobile version