आपलं महानगर आयोजित गणेश चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

आपलं महानगर आयोजित गणेश चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

गणेश चित्रकला स्पर्धेचे विजेते (फोटो - प्रवीण काजरोळकर)

दैनिक आपलं महानगर तर्फे घेण्यात आलेल्या ‘गणेश चित्रकला स्पर्धा २०१८’चा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही गर्दी केली होती. विजेत्या विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस, जय मल्हार फेम पुर्वा सुभाष, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सोनाली शिंगोटे, हर्ष पॅकर्सचे संदीप धुरी आणि दै. आपलं महानगरचे संपादक संजय सावंत उपस्थित होते. छोटा शिशू ते दहावी पर्यंत पाच गटात ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. गणेश चित्रकला स्पर्धेसाठी मुंबईभरातून सहा हजारांच्या वर चित्र आले होते. त्यापैकी १२० मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पाचही गटातून प्रथम तीन याप्रमाणे पंधरा पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर विशेष विद्यार्थ्यांनाही पाच पारितोषिके देण्यात आली. माटुंगा येथील रामनारायण रुइया महाविद्यालयातील सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

First Published on: October 21, 2018 11:36 AM
Exit mobile version