कल्याणच्या पत्रिपुलावरील अपघाताचे तीव्र पडसाद

कल्याणच्या पत्रिपुलावरील अपघाताचे तीव्र पडसाद

कल्याण पत्रिपुलावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहन चालक हैराण झालेले असतानाच शुक्रवारी पत्रिपुलावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरात तीव्र पडसाद उमटले. या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एम.आर.डी.सी. चे श्राद्ध घालत मनसे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून मुंडन केले.

तर अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, रिपाई, शेतकरी कामगार पक्ष, तीसाई रिक्षाचालक-मालक असोसिएशन, कल्याण व्यापारी संघटना, जनकल्याण सेवाभावी संस्था कल्याण (पूर्व) यांच्या सहकार्याने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

गेल्या वर्षभरापासून पत्रिपुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी ने कल्याण डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. सध्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली असून, त्यातूनच लोकांना जीव गमवावा लागत आहे. शुक्रवारी टेम्पोने रिक्षा आणि मोटारसायकल धडक देऊन झालेल्या अपघात अरुण महाजन यांच्या जागीच मृत्यू झाला असून, विलास रेडकर हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिक संतापले आहेत.

First Published on: August 11, 2019 5:08 AM
Exit mobile version