विनयभंग प्रकरणी डॉक्टरला कारावास

विनयभंग प्रकरणी डॉक्टरला कारावास

प्रातिनिधिक फोटो

विनयभंगाच्या प्रकरणात न्यायालयाकडे प्रकरण निकाली काढण्याचा अर्ज करणार्‍या डॉ. जयवंत एस. जाधव याला विनयभंग प्रकरणी दोषी ठरवीत ठाणे जिल्हा अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश एस. गुप्ता यांनी एक वर्षाचा कारावास आणि तीन हजाराचा दंड अशी शिक्षा बुधवारी ठोठावली.

ठाणे जिल्हा अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश एस. गुप्ता यांच्या न्यायालयात विनयभंग प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकारच्या बाजूने युक्तीवाद केला. 18 मे, 2013 रोजी 54 वर्षीय महिला उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल झाली. तपासणीसाठी आरोपी डॉ जयवंत जाधव हे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आले आणि महिलेचा विनयभंग केला. एवढ्यावरच डॉ. जाधव थांबले नाहीत तर त्यांनी पुन्हा दीडतासाने पुन्हा विनयभंग केल्याने महिलेने तक्रार केली. असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील हिवराळे यांनी केला.

उपचारानंतर महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा आरोपी डॉ जाधव यांच्यावर दाखल केला. नौपाडा केली. याच प्रकरणात आरोपी डॉ. जयवंत जाधव याला 27 डिसेंबर, 2016 रोजी प्रथमवर्ग न्यायालयाने दोषी ठरविले होते आणि शिक्षाही ठोठावली होती.

First Published on: August 15, 2019 1:24 AM
Exit mobile version