तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी चार वर्षांनंतर 8 पोलिसांवर कारवाई, पहा काय आहे प्रकरण

तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी चार वर्षांनंतर 8 पोलिसांवर कारवाई, पहा काय आहे प्रकरण

धारावी पोलिस ठाण्यात कोठडीत चौकशीनंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटना 4 वर्षांपूर्वी घडली होती. सचिन जैस्वाल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. या घटनेला 4 वर्ष झाल्यानंतर 8 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ निरीक्षकासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना दंड आणि वेतनवाढ तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र, या कारवाईवर सदर तरुणाचे कुटुंबिय समाधानी नाहीत. कुटुंबातील एक सदस्य गमावल्यामुळे ते एफआयराची मागणी करत आहेत.

सुटका झाल्यानंतर मृत्यू –

धारावी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते. त्याची सुटका झाल्यानंतर सहा दिवसांनी अल्पवयीन मुलाचा आजारपणात मृत्यू झाला होता.

सचिन जैस्वाल याला 13 जुलै 2018 रोजी धारावी येथील घरातून बेकायदेशीरपणे उचलण्यात आल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर सचिन तंदुरुस्त होता. मात्र, पोलीस ठाण्यामध्ये त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी काही आजरा झाला. सुरुवातील औषध उपचारानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्याता आले आणि सहा दिवसांनंतर 21 जुलै 2018 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असेही कुटुंबाने सांगीतले.

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अंतिम संस्कार –

सचिनचा मृत्यू लेप्टोस्पायरोसिसमुळे झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. मात्र, कुटुंबियांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. एप्रिल 2021 मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर जेजे रुग्णालयात पडून असलेला मृतदेह ताब्यात घेत कुटुंबियांनी त्याच्यावर अंतिम संस्कार केले.

First Published on: June 19, 2022 4:18 PM
Exit mobile version