अपंग डब्यातील घुसखोरांवर कारवाई

अपंग डब्यातील घुसखोरांवर कारवाई

उपनगरीय लोकल मार्गावर अपंग डब्यातून प्रवास करणार्‍यांविरोधात मध्य रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)ने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या १५ दिवसात अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍या १ हजार प्रवाशांवर कारवाई केली आहे. ज्यामध्ये सामान्य प्रवाशांबरोबर अनेक सरकारी कर्मचार्‍यांच्या समावेश आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमधील अपंग, अंध, कॅन्सरग्रस्त प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये दोन डबे राखीव आहेत. मध्य रेल्वेवर सकाळच्या गर्दीत लोकलमध्ये शिरणे कठीण असल्याने अनेक प्रवासी अपंग डब्यातून येण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यात सरकारी कर्मचार्‍यांसह अन्य प्रवासीही या डब्यांतून प्रवास करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. सोबतच यासंबंधित नुकताच भायखळा रेल्वे स्थानकांवर एका कार्यक्रमाला रेल्वे मंत्री पियुष गोयल आले होते. तेव्हा एका अपंग मुलीने आपल्या व्यथ्या रेल्वे मंत्र्यांसमोर मांडल्या होत्या. पियुष गोयल यांनी रेल्वे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर रेल्वे पोलिसांनी २५ जुलैपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत या मोहिमेंतर्गत १ हजार घुसखोरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६७ खासगी कंपन्यांतील कर्मचारी आणि ६ सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हा नोंदवून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

First Published on: August 12, 2019 1:10 AM
Exit mobile version