पीएमसी परिसरातील दुकानदारांवर कारवाई

पीएमसी परिसरातील  दुकानदारांवर कारवाई

Plastic Ban

नवी मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून संयुक्तपणे प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहिमा राबविल्या जात आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांकडून प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एपीएमसी परिसरात माथाडी कामगार भवनाजवळील विविध दुकानांमध्ये अचानक छापा टाकण्यात आला. तिथून 2500 किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आले. तसेच 9 दुकानदारांकडून पहिल्यांदा कारवाई होत असल्याने प्रत्येकी 5 हजार रुपये आणि एका दुकानदाराकडून दुसर्‍यांदा कारवाई होत असल्याने 10 हजार रुपये असा 55 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मार्केटमधील शोभा ट्रेडर्स या दुकानामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा सापडला.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या दुकानदारांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तीन दुकानदारांकडून 15 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. याशिवाय रस्त्यावर कचरा टाकून शहर अस्वच्छ करणार्‍या दुकानदारांकडूनही तीन हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. पर्यावरणाला व मानवी जीवनाला हानीकारक असणार्‍या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक पिशव्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने तपासणीही करण्यात येत आहे.

First Published on: October 6, 2018 1:58 AM
Exit mobile version