झी वाहिनीचे प्रसारण दोन तास बंद

झी वाहिनीचे प्रसारण दोन तास बंद

गेल काही दिवस झी वाहिनीवर वेगवेगळ्या मालिकांमधून भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला. मालिकेच्या माध्यमातून एखाद्या पक्षाचा प्रचार करणे हे आचारसंहीतेच्या विरोधात आहे. झी वाहिनीवर आचार संहितेचे सारे नियम धाब्यावर बसवत मालिकेमधून प्रचार केला. यावर निवडणूक आयोगानने कारवाई केली आहे. आज सकाळी झी वाहिनीच्या कार्यक्रमांच प्रसारण 8 ते 10 यावेळेत बंद करण्यात आलं होतं.

आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने या मालिकेच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. मालिकेच्या निर्मात्यांना २४ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. ‘भाजपा दिवसेंदिवस खालच्या दर्जाची राजनीती करत आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी आता मालिकांचाही वापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावं,’ असं ट्विट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं होतं. याविषयी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.

याविषयी वाहिनीने मांडली बाजू

कंपनी प्रवक्ता म्हणाले की, “एक जबाबदार राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्क म्हणून झी टीव्हीने कायमच मार्गदर्शक तत्वांनुसार साहित्यनिर्मिती केली आहे. टेलिव्हिजनवर प्रसारित कार्यक्रमांमधील काही एपिसोड्समधील विशिष्ट शासकीय योजनांचा उल्लेख हा फक्त जनतेच्या हितासाठी करण्यात आला होता.”

झी वाहिनी म्हणते, हे तर मतदानासाठी

निवडणुक आयोगाने दोन तास झी बंद ठेवल्यानंतर यावर झी नेटवर्क म्हणत, दोन तास चॅनल हे लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करा.

First Published on: April 11, 2019 3:13 PM
Exit mobile version