लोकांना 31st ची पार्टी रात्रभर करु द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

लोकांना 31st ची पार्टी रात्रभर करु द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

फोटो सौजन्य - Wikipedia

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील कायदेशीर मनोरंजन आणि आनंदोत्सवाची सर्व ठिकाणे रात्रभर खुली ठेवण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वार मागणी केली आहे. याआधी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी रात्रभर दुकाने, हॉटेल खुले ठेवण्याची मागणी केली होती.

मुंबई २४×७ खुली राहावी

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण घराबाहेर पडतात. रात्रभर नववर्षाचे स्वागत करत पार्टी करत असतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई आणि इतर शहरे २४×७ खुली राहावी यासाठी मुंबई महापालिकेच्या २०१३ च्या मंजूर प्रस्तावाला मुंबई पोलीस आयुक्तांनी २०१५ मध्ये परवानगी दिली. २०१७ ला हा प्रस्ताव विधानसभेतही मंजूर झाला. पण सदर प्रस्ताव गेले काही महिने गृहखात्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याची आठवण मुख्यमंत्र्याना करून देत आदित्य ठाकरे यांनी ही सूचना केली आहे.

राज्याला फायदा होईल

३१ डिसेंबरला मुबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील कायदेशीर मनोरंजनाची आणि आनंदोत्सव साजरा करण्याची सर्व ठिकाणे रात्रभर खुली ठेवावीत, असे या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. जे दिवसा कायदेशीर आहे ते रात्री बेकायदेशीर कसे ठरेल, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाने राज्याला फायदा होईल, रोजगाराच्या संधी वाढतील. भूमिपुत्रांना नोकऱ्या उपलब्ध होतील, असा आशावादही व्यक्त केला आहे.

आणि शिवसेना मवाळ झाली

आदित्य ठाकरेंकडे सूत्र आल्यापासून शिवसेनेचा चेहरामोहरा बदलतोय. आधी शिवसेना व्हेलेंटाईन डेला विरोध करत होती. मात्र शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे झाले तेव्हापासून ते तरुणायींना जे करायला आवडते त्याला विरोध करु नये यासाठी प्रयत्न करु लागले. त्यांनी याधी टेरेस पार्टीची मागणी केली आहे. नव वर्षाचे स्वागत करताना तरुणाईंना धमाल करता यावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मनोरंजन आणि आनंदोत्सवाची ठिकाणं रात्रभर खुली रहावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – 

आदित्य ठाकरेंना ‘एमआयएम’चे खुले पत्र

First Published on: December 27, 2018 11:03 AM
Exit mobile version