लस खरेदीवर जागतिक पातळीवर पडताळणी करा, आदित्य ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

लस खरेदीवर जागतिक पातळीवर पडताळणी करा, आदित्य ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

लस खरेदीवर जागतिक पातळीवर पडताळणी करा, आदित्य ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. आपल्या विनंतीनंतर मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही मंत्री ठाकरे यांनी दिली. राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

First Published on: May 10, 2021 10:28 PM
Exit mobile version