तब्बल ४ दिवसांनी वसई-विरारला पेटले दिवे

तब्बल ४ दिवसांनी वसई-विरारला पेटले दिवे

वसई पाण्याखाली (फाईल फोटो )

मुंबईत सलग चार दिवस बरसलेल्या पावसाचा सगळ्यात जास्त मनस्ताप वसई- विरारवासियांना सहन करावा लागला. कारण पावसाची संततधार, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि त्याहीपेक्षा चार दिवस विरार- वसई परीसरात गुडुब अंधार पसरला. ज्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागला. पण बुधवारी संध्याकाळी अखेर या ठिकाणचे दिवे पेटले आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

म्हणून बंद केला वीज पुरवठा

वसई- विरार परिसरात पावसाचा वाढता जोर पाहता महावितरणणे येथील वीज पुरवठा खंडीत केला होता. शिवाय या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वसईतील उच्च दाब केंद्रात पाणी शिरल होते.पण पाऊस एका दिवसात ओसरेल, दुसऱ्या दिवशी लाईट येईल अशी अपेक्षा लोकांना होती. पण पाऊस कमी झालाच नाही. त्यामुळे येथील वीज पुरवठा बंदच ठेवण्यात आला. आज या पावसाचे पाणी ओसरल्यानंतर व दुरुस्ती करण्यात आली आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.  भागात पाऊस आला की वीज पुरवठा बंद करण्यात येतो. पण यंदा पहिल्यांदाच ४ दिवस रहिवाशांना अंधारात काढावे लागले.

महावितरणने पाठवला एसएमएस

महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत करण्यासंदर्भातील मेसेज ग्राहकांना पाठवण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना याची कल्पना होती. यात वीज पुरवठा खंडीत करण्याचे कारण देखील सांगण्यात आले.

महावितरणकडून पाठवण्यात आलेला एसएमएस

वसई- विरार झाले ‘जलमय’

शनिवारी पडलेल्या पावसात वसई- नालासोपारा- विरार या स्थानकांवर पाणीच पाणी झाले होते. ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वे भाईंदरपर्यंत सुरु होती. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून वीजेचा धक्का बसू नये म्हणून महावितरणकडून येथील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे चार दिवस येथील रहिवासी अंधारात होते.

First Published on: July 11, 2018 7:03 PM
Exit mobile version