CoronaVirus- नायरमधील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनाही ठेवणार विलगीकरण कक्षात!

CoronaVirus- नायरमधील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनाही ठेवणार विलगीकरण कक्षात!

नायर रुग्णालयात आत्तापर्य़ंत १००१ बाधित मातांची सुखरुप प्रसूती;

केईएम रूग्णालयातील डॉक्टर तसेच परिचारिकांना रूग्णांपासून संसर्ग झाल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यात नायर रूग्णालयाचीही भर पडली आहे. नायरमध्ये एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सकाळच्या सत्रातील २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नायर डेंटल रुग्णालयात पाच दिवस विलगीकरणासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना १४ दिवस घरामध्ये विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी एका रूग्णाला श्वसनविकाराचा त्रास होत असल्यामुळे नायर रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी या रूग्णाचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सकाळच्या सत्रातील २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नायर डेंटल रुग्णालयात येथे पाच दिवस विलग ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या थुंकीचे नमुने घेऊन पुढे १४ दिवस त्यांना घरात विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोव्हिडची चाचणी सकाळी आल्यामुळे या रुग्णाला हा संसर्ग झाला होता, याची माहिती कर्मचाऱ्यांना नव्हती. कोणताही रुग्ण दगावू नये, यासाठी डॉक्टर प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. या बाधित रुग्णामुळे दिवसपाळीत असलेल्या परिचारिकांप्रमाणे रविवारी रात्रपाळीला असलेल्या परिचारिकांनाही घरातच विलग करण्यात आल्याचे समजत आहे.

First Published on: March 31, 2020 10:32 AM
Exit mobile version