‘हा ड्रामा गरजेचा आहे का?’; रेणुका शहाणेनं साधला सरकारवर निशाणा

‘हा ड्रामा गरजेचा आहे का?’; रेणुका शहाणेनं साधला सरकारवर निशाणा

रेणुका शहाणे

अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली. कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकाम तोडल्याचे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले असून मुंबई महापालिकेच्या कारवाईला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे हिने ट्विटरवर सरकारला सवाल करत या प्रकरणात लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

असे केले रेणूका शहाणेंनी ट्विट

‘जरी मला कंगनाचे मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे वक्तव्य रुचले नाही. तरीही सूडभावनेने पालिकेने केलेल्या उद्धवस्तेमुळे मी अस्वस्थ झाले आहे. तुम्हाला इतक्या खालच्या स्तरावर जाण्याची गरज नाही. @CMOMaharashtra कृपया यामध्ये हस्तक्षेप करा. आपण सर्वजण महारोगराईचा सामना करत आहोत. आता या अनावश्यक नाटकाची गरज आहे का?’ असे रेणूका शहाणेने ट्विट केले आहे.

कंगनाला सुनावले खडेबोल

यापूर्वी रेणुका शहाणेने कंगनाने केलेल्या पीओकेच्या मुद्द्यावरून तिला उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असे म्हणत खडेबोल सुनावले होते.

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर BMC ने कारवाई केली. ही कारवाई सुरुवात असताना कंगनाने शिवसेना आणि BMC वर चांगलाच निशाणा साधला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले होते.

पुन्हा कंगनाने ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ असा हॅशटॅग देऊन नवं ट्विट केल्याचे समोर आले आहे. मुंबईत दाखल होताच कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसते आहे. तर पुन्हा कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


Video: ‘आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड तुटेगा..’ कंगनाने मुख्यमंत्र्यावर साधला निशाणा

First Published on: September 9, 2020 6:42 PM
Exit mobile version