बच्चन पितापुत्रापाठोपाठ आता ऐश्वर्या बच्चन आणि आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह!

बच्चन पितापुत्रापाठोपाठ आता ऐश्वर्या बच्चन आणि आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह!

बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीसह त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना देखील धक्का बसलेला असताना आता त्यांना दुसरा धक्का बसला आहे. अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan) आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन (Aradhya Bachchan) या दोघी देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची धक्कादायक बातमी स्पष्ट झाली आहे. के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता या दोघींना देखील क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता बच्चन कुटुंबापैकी एकूण ४ जणांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, श्वेता नंदा, अगस्त्य नंदा, नव्या नंदा आणि खुद्द जया बच्चन हे बच्चन कुटुंबातील इतर सदस्य मात्र कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दोघींना सौम्य लक्षणं!

शनिवारी रात्री जेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या घरातल्या इतर सदस्यांचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. तेव्हा यामध्ये त्यांची प्रकृती ठीक होती. शरीराचं तापमान सामान्य होतं. मात्र, त्यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट आज अखेर आल्यानंतर त्यात ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघींना देखील अगदी सौम्य लक्षणं दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांच्याही संपर्कात एकूण २८ जण गेल्या १० दिवसांत आल्याची माहिती मिळत असून त्या सगळ्यांचा शोध आता सुरू झाला आहे.


हेही वाचा – बच्चन कुटुंबानंतर अनुपम खेर यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण!
First Published on: July 12, 2020 2:53 PM
Exit mobile version