बॉलीवूडचे स्टंटमॅन वीरू देवगण यांचे निधन

बॉलीवूडचे स्टंटमॅन वीरू देवगण यांचे निधन

अजय आणि वीरू देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचे वडिल आणि अॅक्शन डिरेक्टर वीरू देवगण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सांताक्रूझ येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवार, सायंकाळी ६ त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

हटके अॅक्शनसाठी प्रसिद्ध 

वीरू देवगण यांनी बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. इन्कार, मि. नटवरलाल, क्रांती, शेहनशाह, हिंमतवाला, त्रिदेव, बाप नंबरी बेटा दस नंबरी, फुल और काँटे अशा अनेक चित्रपटातील अॅक्शन दृश्यं त्यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली होती. प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव असतानाही त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक हटके अॅक्शन आणल्या. त्यामुळं त्यांची वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९९ साली त्यांनी ‘हिंदुस्तान की कसम’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. त्यात अमिताभ बच्चन, अजय देवगण, मनीषा कोइराला, सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

First Published on: May 27, 2019 3:11 PM
Exit mobile version