‘या’ तमिळ सिनेमाचा रिमेक करतोय अजय!

‘या’ तमिळ सिनेमाचा रिमेक करतोय अजय!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आपल्या चाहत्यांसाठी एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तान्हाजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आणखी एक नवा सिनेमा घेऊन येत आहे. अजय देवगण २०२१ च्या सुरूवातीस एका तमिळ फिल्मच्या रिमेक मध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तमिळ मधील कैथी या सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अजयने ट्विटरद्वारे दिली आहे.

ट्विटरवरून दिली माहिती

अजय देवगणच्या तान्हाजी द वॉरीयर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आता एका नव्या चित्रपटाचे रिमेक करत असल्याची माहिती त्याने ट्विटर द्वारे दिली आहे. ट्विटरवर त्याने म्हटले आहे की,’ मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदीतून रिमेक करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या काळात १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रदर्शित होईल’ असे त्याने सांगितले आहे. तसेच हा एक अॅक्शन सिनेमा असून या सिनेमात अजय मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

 

यादेखील चित्रपटात झळकणार अजय

अजय देवगण चा तान्हाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवत २७० कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. या सिनेमात अजय सोबत काजोल आणि सैफ अली खान देखील मुख्य भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले. यानंतर अजय मैदान या सिनेमात देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे. मागील काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. अजय २०२१ आधी मार्च महिन्यात रिलीज होणारा ‘सूर्यवंशी’ तसेच ऑगस्ट महिन्यात ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ अशा सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

First Published on: March 2, 2020 3:13 PM
Exit mobile version