अजिंक्य राहाणे झाला बाबा!

अजिंक्य राहाणे झाला बाबा!

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. भारताचा क्रिकेटर हरभजन सिंह याने ट्विटरवरी ट्विट करुन ही गुडन्यूज दिली आहे. सध्या अजिंक्य राहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. ही गुडन्यूज कळताच चाहत्यांनी अजिंक्य आणि राधिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दोघेही बालपणीचे मित्र

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी अजिंक्य राहाणेने तो बाबा होणार असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यावेळी अजिंक्यने राधिकाच्या डोहाळे जेवणाचे फोटोसुद्धा शेअर केले होते. त्यांच्या या फोटोवर भरपूर लाइक्स आणि कमेंट आले होते. अजिंक्य आणि राधिका हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. महाविद्यालयात असताना दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१४ मध्ये अजिंक्य आणि राधिका विवाहबंधनात अडकले.

First Published on: October 5, 2019 3:46 PM
Exit mobile version