कोणाला किती मुलं होती मी सांगू का?; अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार

कोणाला किती मुलं होती मी सांगू का?; अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार

राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप जरी मागे घेण्यात आला असला तरी, विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. धनंजय मुंडेवर विरोधक टीका करत आहेत. धनंजय मुंडेंच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेताना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मागील काळात कुणी काय लपवाछपवी केले हे सांगू का? असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडें प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी प्रकरणावर आपले स्पष्टीकर दिले आहे. परंतु तरीही विरोधक टीकेचे बाण सोडत आहेत. विरोधकांनी टीका कऱणे हे त्यांचे काम आहे. परंतु कोणत्या पातळीपर्यंत मर्यादीत असावी यालाही मर्यादा आहे. असे म्हणत मागील काळात कुणी किती लपवाछपवी केली आहे. हे मी सांगू का असा धमकीवजा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. कोणाला किती मुले आहेत? तसेच कोणाचे लग्न झाले होते की नव्हते झाले हेही सांगू का? अशा कितीतरी गोष्टी मला माहीत आहे. त्या सांगितल्या पाहिजेत का असा प्रश्नही अजित पवार यांनी केला आहे.

जतीनिहाय जनगणना करण्याची मागणी जुनी असून मागच्या लोकसभेच याबाबत मागणी करण्यात आली होती. गेले अनेक वर्षांपासून ही मागणी केली आहे. तसेच जातीनिहाय जनगणना करायचे की, नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तसेच हा लोकसभेचा अधिकार आहे. जातीनिहाय जणगणना करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. केंद्राने जनतेच्या मागण्यांवर लक्ष द्यायला हवे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

First Published on: January 25, 2021 3:22 PM
Exit mobile version