अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल, कागदावर लिहिलं ‘Photo लेते रहो’!

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल, कागदावर लिहिलं ‘Photo लेते रहो’!

विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेक कारणांमुळे चर्चेत होत्या. मग त्यांचा बदललेला लुक असो किंवा त्यांची सोशल मीडियावर व्हायरल होणारी गाणी असोत. पण आता अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. तेही त्यांनी पेपरवर लिहिलेल्या एका मेसेजमुळे! कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस २०१९-२०साठीच्या वर्कशॉपमध्ये अमृता फडणवीस ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. या बैठकीमध्ये अमृता फडणवीस यांचे काढलेले फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर देखील पोस्ट केले आहेत. आणि इथेच खरा गोंधळ झाला.

फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अमृता फडणवीस यांच्यासमोर काही कागद आणि त्यांच्यावर काहीतरी मजकूर लिहिलेला दिसत आहे. मात्र, एका कागदावर त्यांनी लिहिलेला मजकूर मात्र व्हायरल होऊ लागला आहे. ‘Photo लेते रहो’ असा संदेश त्यांनी या कागदावर टाकला आहे. त्यामुळे हा सगळा खटाटोप प्रसिद्धीसाठीच आहे का? असा प्रश्न नेटिझन्सकडून विचारला जाऊ लागला आहे.

First Published on: July 9, 2020 12:38 PM
Exit mobile version