आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोरीच्या गुन्ह्यांत माजी कर्मचार्‍याला अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोरीच्या गुन्ह्यांत माजी कर्मचार्‍याला अटक

पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हेडींग मशिन उघडून आतील कॅश चोरी झाली होती. याप्रकरणी एका माजी कर्मचार्‍याला रविवारी सहार पोलिसांनी अटक केली. विकी शिवलाल अलकुटे असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून तो घाटकोपरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हेडीमन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. या ठिकाणी अ‍ॅटोमेटीक मशिनद्वारे खाद्यपदार्थ आणि खाद्यपेय विक्रीसाठी बसविण्यात आले आहे. तक्रारदारांवर मशिनमध्ये दिवसभरात जमा झालेली रक्कम कंपनीच्या विलेपार्ले येथील कार्यालयात जमा करण्याची जबाबदारी आहे.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मशिन ऑपरेटर रविंद्र गौतम वरखडे याला मशिनमध्ये कमी पैसे जमा झाल्याचे दिसून आले. त्यातच त्याला तिथे पूर्वी मशिन ऑपरेटर म्हणून काम करणारा विकी अलकुटे हा संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसून आले. ही चोरी विकीनेच केल्याचा संशय व्यक्त करुन त्याने ही माहिती तक्रारदारांना दिली. त्यानंतर त्यांनी विकीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे शंभर रुपयांची एक, पन्नासची दोन, वीसची अकरा आणि दहाच्या सत्तावीस नोटा सापडल्या. चौकशीअंती त्यानेच व्हेडींग मशिन मागे ठेवलेल्या चावीने उघडून 740 रुपयांची कॅश चोरी केल्याची कबुली दिली. ही माहिती नंतर सहार पोलिसांना कळविण्यात आली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच विकी अलकुटे याला पोलिसांनी अटक केली.

First Published on: February 11, 2019 10:06 PM
Exit mobile version