मुंबईकरांच्या खिशाला कात्री; सुट्या दुधाच्या किमतीत वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; सुट्या दुधाच्या किमतीत वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू

मुंबईकरांच्या(mumbai) खर्चात आता अधिकच वाढ होणार आहे. कारण सुट्या दुधाच्या किमतीती वाढ होणार आहे. मुंबईमध्ये हे नवे दर 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येतील. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.(milk price increase in mumbai)

हे ही वाचा – Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, अमूलने सांगितले ‘या’ दरवाढीमागचे कारण

काही दिवसांपूर्वी अमूलने(amul milk) दुधाच्या दारात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली होती. अमूल नंतर मदर डेअरी (mother dairy) आणि इतरही दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. पण आता त्या पाठोपाठ सुट्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 7 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे सुटे दुष्ट खरेदी करताना प्रतिलिटर दुधासाठी मुंबईकरांना 80 रूपये मोजावे लागणार आहेत आणि हे नवे दर 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येतिल. त्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या घर खर्चात आता वाढ होणार आहे.

हे ही वाचा – Mother Dairy Milk : आता मदर डेअरीच्या दूध दरातही मोठी वाढ, जाणून घ्या दर

चाऱ्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचबरोबर तूर आणि हरभऱ्याच्या किमती सुद्धा 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सुट्या सुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. असं अध्यक्ष सी. के. सिंह आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितले. या संदर्भात रविवारी संघाची बैठक सुद्धा झाली. ही दूध दरवाढ 1 सप्टेंबर 2022 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल अशी माहिती सुद्धा देण्यात आली.

हे ही वाचा – Milk Agitation LIVE Updates: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार – सुनील केदार

First Published on: August 29, 2022 10:02 AM
Exit mobile version