अंगणवाडी कर्मचार्‍यांचे साखळी धरणे आंदोलन

अंगणवाडी कर्मचार्‍यांचे साखळी धरणे आंदोलन

आशा सेविकांचे आंदोलन

मानधनात वाढ, सेवा शर्तीत सुधारणा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका २३ फेब्रुवारीपासून साखळी धरणे आंदोलन करणार असून, हे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ८३ हजार अंगणवाडी सेविका, ८३ हजार मदतनीस व १३ हजार मिनी अंगणवाडी सेविका, शहरी, ग्रामीण व आदिवासी भागात कार्यरत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्यतिरिक्त, आरोग्य व आदिवासी विभागाच्या कामांचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोरोना काळात अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन आपले काम चोख बजावले. मात्र असे असले तरी २०१७ पासून देशात महागाई वाढून सुद्धा राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात कोणतीही वाढ केली नाही. महाविकास आघाडी सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन व सेवा शर्तीमध्ये सुधारणा करू असे लेखी वचननामा जाहीर केला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मानधन वाढ, पेंशन योजना व योजनाचे काम करण्यासाठी नवीन मोबाईल अशा विविध मागण्यांसाठी २३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यातील २ लक्ष अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर साखळी धरणे आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नेते बृजपाल सिंह यांनी सांगितले.

First Published on: February 19, 2022 10:54 PM
Exit mobile version