ठाकरे चित्रपटानंतर आता आनंद दिघेही मोठ्या पडद्यावर

ठाकरे चित्रपटानंतर आता आनंद दिघेही मोठ्या पडद्यावर

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर करत जर आनंद दिघे असते तर त्यांनी शिवसेना सोडली असती का? असा सवाल उपस्थित करत, एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.

ठाण्याचे राजकारण आणि आनंद दिघे यांचे एक विलक्षण नाते होते. ठाण्यातील अनेक शिवसैनिक आजही त्यांना आपले दैवत मानतात. त्यामुळे त्यांचेही जीवनचरित्र येणार्‍या पिढीला समजले पाहिजे. आनंद दिघेंबद्दल माहिती असणारी सध्या मोजकीच मंडळी उरली आहेत. त्यांच्याकडून आनंद दिघे यांच्याबद्दल इत्थंभूत माहिती घेऊन त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी तशी घोषणा आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कोणतीही निवडणूक न लढवता मुख्य राजकारणावर आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. 27 जानेवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती संपूर्ण ठाणे जिह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

First Published on: January 31, 2019 4:45 AM
Exit mobile version