लॉरेन्स बिष्णोईच्या नावे पुन्हा एक बनावट फोन

लॉरेन्स बिष्णोईच्या नावे पुन्हा एक बनावट फोन

टॅक्सी ड्रायव्हरने बॅचलर असल्याचे भासवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले, नंतर सत्य समोर आल्यावर तिची हत्या

 मुंबई : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीने फोन करीत कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई हा मुंबईत येत असून तो काही तरी मोठे करणार असल्याची माहिती दिली . यामुळे मुंबई पोलीस ,जी आर पी एफ ,आर पी एफ या सर्व यंत्रणा कामाला लागला . मुंबई शहरात मोठा गस्त घालण्यात आला . मात्र पोलिसांनी घातलेल्या गस्त व पाहणी मध्ये  तसे काही आढळून न आल्याने पोलिसांनी ह्या फोन करणाऱ्या व्यक्ती बाबत तपासणी सुरु आहे.
 हेही वाचा – Maharashtra politics : भाजपासोबत जाण्यास सहमत नव्हतो अन् नाही, शरद पवारांचा पुनरुच्चार
मागील आठवड्यात बुधवारी देखील  गाजिया बाद येथे राहणाऱ्या  रोहित त्यागी नामक  विद्यार्थ्याने  लॉरेन्स बिष्णोई च्या नावाने इंटरनेट च्या माध्यमातून टॅक्सी बुक केली होती .ठरल्या प्रमाणे कॅब चालक हा वांद्रे परिसरात पोहचला असता व तेथे लॉरेन्स विषयी विचारणा केली असता , तिथे या नामक कोणीही व्यक्ती आंधळी नसल्याने या कॅब चालकाने घडलेला प्रकार येथील सुरक्षा रक्षकांना सांगितला . सुरक्षा रक्षकांनी हि माहिती पोलीसानां दिली त्या माहिती आधारे तपासणी केली असता . गाझियाबाद येथील  गृहनगर येथे राहणाऱ्या  रोहित त्यागी यास पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या नावाने फोन करणे तसेच अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथील घराच्या परिसरात पाठवून दहशत निर्माण केल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे . त्याने हा फाजील प्रकार मुदाम करमणूक पूर्व घडवून आणल्याचे त्याच्या जबाबात समोर आल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. तसेच काहीसे या फोन मागे असणार असा समज पोलिसांचा असून या फोन बाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत . काही दिवसा पूर्वीच  सलमान खान यांच्या वांद्रे येथील घर शेजारी झालेल्या अज्ञात दुचाकी स्वारानी केलेल्या फायरिंग मुळे प्रकरण तापले असताना त्यात वरचेवर होणारे असे कॉल पोलिसांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहेत .
 हेही वाचा – Lok Sabha 2024 : वाढता वाढता वाढे… सांगलीच्या खासदाराची संपत्ती 5 वर्षांत 29 कोटींनी वाढली
First Published on: April 20, 2024 2:09 PM
Exit mobile version