केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती – शिवाजी जोंधळे

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती – शिवाजी जोंधळे

आगामी विधानसभा निवडणूक – २०१९ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत १० केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हा हद्दीत विधानसभेचे एकूण १० मतदारसंघ येतात.

अशी आहे नियुक्ती

सर्वसामान्य व पोलीस केंद्रीय निरीक्षक १७८ धारावी व १७९ सायन एच. के. शर्मा, १८१ माहिम व १८० वडाळा बिजल ए. शहा, १८२ वरळी व १८३ शिवडी सलमा फाहीम, १८४ भायखळा व १८५ मलबार हिल शेली क्रिष्णानी, १८६ मुंबादेवी व १८७ कुलाबा डी.एस. मंगत तसेच पोलीस विभागासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून शशी प्रभा द्विवेदी निवडणूक खर्चाचे केंद्रीय निरीक्षक विशेष निवडणूक खर्च निरीक्षक मधु महाजन यांची मुंबई शहरसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवडणूक खर्चाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून १७८ धारावी, १७९ सायन, १८१ माहिम जसबीर सिंग, १८० वडाळा, १८२ वरळी, १८३ शिवडी संजीव कुमार यादव, १८४ भायखळा व १८५ मलबार हिल शीदौन सिंग भदोरिया, १८६ मुंबादेवी व १८७ कुलाबा, देबा कुमार सोनावल यांची नियुक्ती केंद्रशासनातर्फे विधानसभा निवडणूक – २०१९ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे.

First Published on: October 4, 2019 9:30 PM
Exit mobile version