कलावंतांनी आपला शेक्सपिअर स्वतः शोधावा

कलावंतांनी आपला शेक्सपिअर स्वतः शोधावा

Makrand Deshpande

नाट्य अभिनेत्यांनी आपल्या मनाविरुद्ध या क्षेत्रात वावरू नये. मन रमत नसेल तिथे राहू नये, आपला मार्ग वेगळा करावा, आपला शेक्सपिअर, ऑस्कर वाईल्ड चेकॉव्ह शोधावा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांनी वसईत एका कार्यक्रमात दिला.

वसईतील ज्येष्ठ रंगकर्मी नाना वळवईकर यांच्या तिसर्‍या पुण्यतिथी निमित्ताने अमर कलामंडळाने देशपांडे यांच्या व्याख्यानाचे शनिवारी सायंकाळी आयोजन केले होते. रंगभूमीवरील नवी दैवते स्वीकारली पाहिजेत, नवे विकल्प, नव्या संकल्पना मांडल्या पाहिजेत. तरुण वयातच मला विजय तेंडुलकरांसारखे महान नाटककार भेटले. त्यांनी मला लिहिते केले. त्यामुळे मी नाटकात रमलो आणि चांगला यष्टीरक्षक आणि फलंदाज असतानाही क्रिकेट सोडले, असे देशपांडे यावेळी म्हणाले.

नाटक पाठ करू नका, तर ते तुमच्या तनामनात घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगकर्मी विलास पागार यांनी केले. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक राजीव वेंगुर्लेकर, संतोष वळवईकर, प्रकाश वनमाळी, आशिष भिडे, विजय शिरीषकर, अ‍ॅड. रमाकांत वाघचौडे यांच्यासह अनेकजण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांचा सत्कार करण्यात आला.

First Published on: March 18, 2019 4:00 AM
Exit mobile version