cruise drug case: आर्यन खाननंतर इतर सात जणांचा जामीन मंजूर, सुटकेची प्रक्रिया सुरु

cruise drug case: आर्यन खाननंतर इतर सात जणांचा जामीन मंजूर, सुटकेची प्रक्रिया सुरु

cruise drug case: आर्यन खाननंतर इतर सात जणांचा जामीन मंजूर, सुटकेची प्रक्रिया सुरु

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलचा जामीन मंजूर झाल्यानंतर आता इतर सात जणांचा जामीन मंजूर झाला आहे. विशेष NDPS न्यायालयाने या सात जणांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यन खाननंतर आता इतर सात जणांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टीचे आयोजक संचालक गोपाल आनंद य़ांच्यासह नुपूर सतेजा, गोमीन चोप्रा, अचित कुमार, गोपाळजी आनंद, भास्कर अरोरा, मानव सिंघल आणि समीर सेहगल अशा एकूण सात जणांना मुंबई सत्र न्यायालयाने (NDPS) जामीन मंजूर केला आहे. एनसीबीने क्रूझवर जेव्हा छापेमारी केली तेव्हा आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह नंतर या सातही जणांना अटक केली होती. मात्र सातही जणांच्या जामीन अर्जावर आज विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्ती वैभव पाटील यांनी जामीन मंजूर केला आहे. आता जामीनाची ऑर्डर प्रत आल्यानंतर कादेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच यांचीही सुटका होणार आहे.

मात्र सातही जणांना जामीन मिळाला असला तरी त्याची आज तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता कमी आहे. NDPS ची जामीनाच्या निकालाची अंतिम प्रत आल्यानंतर त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती प्रत तुरुंग प्रशासनाकडे सोपवली जाणार आहे. त्यानंतरच सातही जणांची सुटका होणार आहे. मात्र उद्या रविवार असल्याने सातही जणांना तुरुंगातून बाहेर येण्यासाठी सोमवारची वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, पार्टीतून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या जप्त केल्या होत्या त्याचबरोबर १ लाख ३३ हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर एनसीबीने जप्त केले.


 

First Published on: October 30, 2021 1:55 PM
Exit mobile version