आशा सेविकांचं ७ तारखेला मंत्रालयावर जेलभरो आंदोलन

आशा सेविकांचं ७ तारखेला मंत्रालयावर जेलभरो आंदोलन

आशा सेविकांचे आंदोलन

आशा सेविकांचं मानधन वाढ तसंच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ७ ऑगस्टला आशा सेविका मंत्रालयाजवळ ‘ जेलभरो आंदोलन ‘ करणार आहेत. केंद्र सरकारने आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली. पण, महाराष्ट्र सरकार राज्यात ही मानधनवाढ लागू न केल्याने आशा सेविकांनी मुंबईच्या आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं. त्याची सरकारने दखल न घेतल्याने आशा सेविका आता थेट मंत्रालयावर धडकणार असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

मानधन वाढ देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ

यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’चे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितलं की, ‘‘गावखेड्यात आशा सेविका घरोघरी जाऊन काम करतात. पण, तरीही त्यांना मिळणारं मानधन हे तुटपुंज्या स्वरूपाचे आहे. केंद्र सरकारने आशा सेविकांच्या मानधनात भरीव वाढ केली पण, ही मानधन वाढ देण्यास राज्य सरकार सातत्याने टाळाटाळ करत आहे. यासाठी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी मंत्रालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आलं आहे’’

महाराष्ट्रातील आशा सेविकांना अन्य राज्याच्या तुलनेत कमी मानधन

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव राजेश सिंह म्हणाले की, ‘‘ देशातील काही राज्यांमध्ये आशा सेविकांना दहा हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. पण, महाराष्ट्रातील आशा सेविकांना अन्य राज्याच्या तुलनेत खूपच कमी मानधन आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी आशा सेविकांच्या मानधनात वाढ केली होती. पण, ही मानधन वाढ राज्य सरकारने अद्याप लागू केलेली नाही. ”

६४ हजार आशा सेविकांनी तीव्र नाराजी

“याबाबत अनेक आंदोलनं करण्यात आली. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी सविस्तर चर्चाही केली. पण, फक्त आश्वासनं मिळाली, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची हालचाली झाली नाही. त्यामुळे मुंबई राज्यभरातील ६४ हजार आशा सेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे’’, असंही राजेश सिंह म्हणाले.

First Published on: August 6, 2019 12:50 PM
Exit mobile version