मुंबई फोर्ट परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळला, ४० जणांना सुखरुप वाचवण्यात यश

मुंबई फोर्ट परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळला, ४० जणांना सुखरुप वाचवण्यात यश

मुंबई फोर्ट परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळला, ४० जणांना सुखरुप वाचवण्यात यश

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात असलेल्या आशापूरा या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीतील एकूण ४० जणांना सुखरूप वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या घटनेत कोणताही जीवित हानी झालेली नाही. सकाळी साडेसात वाजतच्या सुमारास ही घटना घडली. सकाळच्या सुमारास लोक कामाच्या वेळेत असतानाही ही घटना घडल्यामुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवशांची तारांबळ उडाली. फोर्ट परिसरातील आशापुरा इमारतीत काम सुरु होते. पडलेला भाग बांबूच्या सहाय्याने लावण्यात आला होता. मात्र बांबू तुटल्याने इमारतीचा मागचा स्लॅब कोसळला असल्याचे तिथल्या रहिवाश्यांनी सांगितले. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती समोर आली आहे. इमारत तयार करणाऱ्या व्यक्तींना देखील घटनास्थळी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (Ashapura building in Mumbai Fort area slab collapsed, 40 people were rescued safely)


अग्निशमन दलाचे जवान योग्य वेळी घटनास्थळी दाखल झाल्याने इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना तातडीने मदत मिळाली व त्यांच्या बाचाव कार्यास यश आले. तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशापुरा ही इमारत फार जुनी आहे. या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरु आहे. डागडूजीचे काम सुरु असताना ही घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील अशा प्रकारच्या अनेक जुन्या इमारती आहेत ज्यांची डागडुजी करण्याचे काम बाकी आहे. जोरदार पाऊस वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक इमारती कोसळत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने अनेक जुन्या आणि धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत.


हेही वाचा – Mumbai corona update: मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर, तर दिवसभरात ५४२ रुग्ण कोरोनामुक्त

 

First Published on: June 25, 2021 10:43 AM
Exit mobile version