शर्जिलला पळून जायला सरकारची मदत; सरकारवर आशिष शेलारांचा आरोप

शर्जिलला पळून जायला सरकारची मदत; सरकारवर आशिष शेलारांचा आरोप

‘हिंदूंना सडलेल्या व्यक्ती म्हणणाऱ्या शर्जिलला आधी पळून का जाऊ दिले. शर्जिला पळून जाण्यास महाराष्ट्र सरकारनेच मदत केली आहे, असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. शिवसेनेची खाली डोकं वर पाय अशा प्रकारची अवस्था झाली आहे’, अशी घणाघाती टीका माजी शिक्षण मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. दरम्यान, एल्गार परिषद घेण्यात आली होती. त्याला परवानगी का दिली?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

देशावर टीका झाली की राऊतांना आनंद होतो

नव्या कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनी दिल्ली ट्रक्टर रॅली काढण्यात आली. त्यानंतर “लाल किल्ल्यावरच्या तिरंग्याच्या बाजूला आंदोलकांनी दुसरा झेंडा लावला आणि आंदोलन अधिकच चिघळले. अशा शेतकऱ्यांचे तुम्ही समर्थन करता का?”, असा सवाल आशिष शेलाराने संजय राऊत यांना विचारला. “देशावर टीका झाली की संजय राऊतांना आनंद होतो”, असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धत का अवलंबताय?

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गाझीपूर येथे जाऊन शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे देखील गेल्या. यावरुन आशिष शेलार यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘बारामतीमध्ये agroच्या माध्यमातून contract फर्मिंग पद्धत आपण का अवलंबताय? या प्रश्नाचे आधी उत्तर द्या आणि मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला जा’, अशी टीका आशिष शेलारांनी खासदार सुप्रिया सुळेंवर केली.


हेही वाचा – सेलिब्रेटींवर देशाचे आंदोलन चालत नाहीत – संजय राऊत


 

First Published on: February 4, 2021 11:52 AM
Exit mobile version