मागण्या मान्य करा अन्यथा…, मुंबईतील रिक्षा चालकांचा बंदचा इशारा

मागण्या मान्य करा अन्यथा…, मुंबईतील रिक्षा चालकांचा बंदचा इशारा

पुणे, औरंगाबाद या शहरांनंतर आता मुंबईतीलही रिक्षा चालकही बंदची हाक देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. गिरगाव येथे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रिक्षाचालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रिक्षा चालकांनी बंद पुकारल्यास प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. (Auto Rickshaw Drivers Unions Likely To Go On Strike)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक घेऊन तोडगा न काढल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या कृती समितीने दिला आहे.

रिक्षा चालक-मालकांच्या मागण्या

या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोना काळातील निर्बंधांमुळे रिक्षाचालक आर्थिक अडचणीत आले असून त्यांच्यावर कर्जाचा आणि व्याजाचा भार आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये प्रचंड असंतोष असून त्याचे रूपांतर तीव्र आंदोलनात होऊ शकते, असा इशारा समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.

याआधी पुण्यातील रिक्षा चालकांच्या बेमुदत बंदच्या आंदोलनानंतर आता औरंगाबादमधील रिक्षा चालकांनी बेमुदत बंदाची हाक दिली होती. रिक्षा मीटर कॅलीब्रेशनसाठी तीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मार्च २०२४ पर्यंत करावी, रिक्षा थांबे देण्यात यावे, रिक्षा पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात यावे. या मागण्यांसाठी १९ रिक्षा संघटनेच्यावतीने औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने रिक्षा बंदचे आवाहन केले.


हेही वाचा – आर्थिक दुर्बल घटकात गेलेल्या मराठा उमेदवारांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रोखली

First Published on: December 2, 2022 7:48 AM
Exit mobile version