राजकारणात डर्टी गेम टाळावा

राजकारणात डर्टी गेम टाळावा

उपेंद्र दाते

अभिनेते-उपेंद्र दाते…

कामे पूर्ण व्हावीत यासाठी मतदान करणार नाही, असे बोलणारे भरपूर समूह पुढे येऊ लागलेले आहेत पण हे काही कारण असू शकत नाही. माणसाला जगण्यासाठी भरपूर गोष्टी हव्या असतात. त्या मिळाल्या नाहीत म्हणून तो जगणे नाकारतो असे नाही. आपल्या कुवतीप्रमाणे तो आपल्या गरजा भागवतच असतो. तसे मतदारांनी मतदान न करण्याला कारण देऊ नये. उलट जो काही विरोध दर्शवायचा आहे तो मतदानातून व्यक्त करता येतो.

तरीपण मतदान करायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी त्यात शहाणपण आहे, असे मला वाटत नाही. मतदान केलेच पाहिजे. राजकारण्यांनी समाजाच्या विकासात आडवे येऊ नये. जे काही डर्टी राजकारण करायचे आहे ते आपल्या स्वत:च्या वैयक्तीक विकासासाठी, पक्षाच्या प्रगतीसाठी करा. पण समाजाच्या हितासाठी एकत्र या. सामान्य माणसाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशा तरतुदींकडे सामुहिकपणे नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

नाटकातील निर्माता, अभिनेता या नात्याने एकच गोष्ट सांगेन रंगभूमीच्याबाबतीत जी काही उदासिनता ऐकायला मिळते, त्याला आम्हीच जबाबदार आहोत. निर्मात्याने, कलाकाराने एकत्र येऊन आपले प्रश्न उपस्थित करायचे असतात. पण इथे छेद निर्माण करणारा दुसरा गट ज्यावेळी उभा राहतो, त्यावेळी सरकारला इच्छा असतानासुद्धा त्या कामाची पूर्तता करता येत नाही, याचे वाईट वाटते.

First Published on: April 29, 2019 4:39 AM
Exit mobile version