पश्चिम रेल्वे मार्गावर कचऱ्याचे प्रमाण वाढले; मिशन मोडवर जनजागृती

पश्चिम रेल्वे मार्गावर कचऱ्याचे प्रमाण वाढले; मिशन मोडवर जनजागृती

पश्चिम रेल्वेवर जनजागृती

पावसाळा एका महिन्यावर आला आहे. पश्चिम रेल्वेने रेल्वे आता जाग आली असून रेल्वे रुळावर कचऱ्या फेकणाऱ्या विरोधात आता जनजागृती करण्यास सुरुवात केली आहेत. चर्चगेट ते विरार या स्थानकादरम्यान कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामुळे पावसाळ्यात रेल्वे रूळ पाणी साचण्याच्या घटना जास्त होतात. लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता जनजागृती करण्यास सुरूवात करण्यात आली आहेत.

लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोरील आव्हान ठरते. पश्चिम रेल्वे क्षेत्रात गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई सेंट्रल, माटुंगा, वांद्रे, माहिम, कांदिवली, मालाड, बांद्रा, अंधेरी, विरार या पश्चिम रेल्वे स्थानकादरम्यान काचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. रेल्वे रूळालगतच्या वस्तीतून रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. त्यामुळे रेल्वे परिसर अस्वच्छ दिसून येतो. परिणामी हा कचरा रेल्वे रुळा लगत असलेल्या नाल्यात जाते. त्यामुळे पाउसाळ्यात रेल्वेच्या नाले चॉकप होतात. परिणामी रेल्वे रुळावर पाणी साचते. त्यामुळे रेल्वे सेवा सुद्धा मोठ्या प्रमाणात यांच्या परिणाम पडतो.

कचऱ्यामुळे रेल्वे रूळावर कचरा फेकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाउसाळ्यात पाणी साचले जाते. त्यामुळे लोकलसेवा खंडीत होते. कचऱ्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. सद्या आम्ही मुंबई सेंट्रल, विरार, अंधेरी या स्थानकावर जनजागृती सुरुवात केली आहेत. ही जनजागृती मोहीम आम्ही पुढे सुद्धा अशीच सुरु ठेवणार आहेत.
– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी नुकतेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल कारशेडचे निरीक्षण केले. यावेळी गुप्ता यांनी रेल्वे रूळावरील काचऱ्याच्या समस्येवर रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. या समस्येचे निवारण करण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यांत आले आहेत. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होण्या अगदोर यावर जनजागृती करण्याच्या निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहेत. पश्चिम रेल्वेने या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बला आणि सामाजिक संस्था यांच्या मदतीने रेल्वेलगतच्या रहिवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे.

First Published on: May 16, 2019 9:45 PM
Exit mobile version