वाडिया हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ ‘ट्युमर’वर शस्त्रक्रिया यशस्वी

वाडिया हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ ‘ट्युमर’वर शस्त्रक्रिया यशस्वी

वाडिया हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ 'ट्युमर'वर शस्त्रक्रिया यशस्वी

टिटवाळा येथील मंदारला एप्रिल २०१८ मध्ये हायपरपिगमेंटेशन, पोटदुखी, उच्चरक्तदाब आणि डोकेदुखी या तक्रारींमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला तपासल्यानंतर ही अॅड्रेनल ग्रंथींशी (पोटातील छोट्या ग्रंथी) निगडित समस्या असावी, असे वाटले. मात्र, त्याच्या शरीरात काही हार्मोनल बदल दिसून आले आणि कॉर्टिसोलचे प्रमाण वाढलेले (४९ यूजी/डीएल) होते. सहसा लहान मुले त्वचेवरील पिगमेंटेशनची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जाते, तेव्हा कार्टिसोल कमी झालेले आढळते. नंतर, त्याचा सीटी स्कॅन केला असता, त्याच्या स्वादुपिंडात गाठ आढळली आणि बायोप्सीनंतर ती पीएनईटी असल्याचे निदान झाले. हा स्वादुपिंडांमधील क्वचित आढळणारा आणि सहसा लक्षात न येणारा ग्रेड थ्री ट्युमर होता.

पॅनक्रिअ‍ॅटिक न्युरोएण्डोक्राइन ट्युमरवर यशस्वी शस्त्रक्रिया

या गाठीचे स्वरूप काहीसे आक्रमक असल्याने रुग्ण दोन वर्षे जगण्याचे प्रमाण ६० टक्के आहे, तर पाच वर्षे जगण्याचे प्रमाण केवळ १६ टक्के आहे. या गाठीतून अ‍ॅड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन (एसीटीएच) नावाचा एक हार्मोन निर्माण होत होता आणि तो अ‍ॅड्रेनल ग्रंथीला अधिक कोर्टिसोल तयार करण्यात भाग पाडत होता. एसीटीएच सहसा पियुषिका (पिट्युटरी) ग्रंथींतून निर्माण होतो. मात्र, या रुग्णामध्ये आश्चर्यकारकरित्या पिट्युटरी ग्रंथींऐवजी हा ट्युमर मोठ्या प्रमाणात एसीटीएच निर्माण करत होता. त्यामुळे मंदारच्या स्वादुपिंडातील ही गाठ नोव्हेंबर २०१८ मध्ये काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ६ तास चालली होती. ५ दिवस पीआयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ७ दिवसांच्या आत त्याला घरी सोडण्यात आले.

न्युरोएण्डोक्राइन ट्युमर काढला

शस्त्रक्रियेनंतर त्याच्या शरीरातील हार्मोन्स पूर्वपदावर आले. पण ६ महिन्यानंतर त्याला कुशिंग्ज विकार म्हणून ओळखला जाणारा आजार झाला (यात शरीरामध्ये कोर्टिसोल या हार्मोनचा स्तर दीर्घकाळापर्यंत दीर्घ राहतो). पोटात मेटास्टॅटिस संक्रम झाले, हायपरपिगमेंटेशन झाले आणि विकाराने पुन्हा डोके वर काढले. आँकोलॉजी पथकाच्या मदतीने त्याने ४ महिन्यांपूर्वी रेडिएशनच्या २४ सायकल्स पूर्ण केल्या, तर महिनाभरापूर्वी केमोच्या ६ सायकल्स पूर्ण केल्या. रुग्णामधील कुशिंग्जची लक्षणे नाहीशी झाली आणि हार्मोन्सच्या चाचण्यांमधून रोग बरा झाला. मात्र, अशा रुग्णांचा आयुष्यभर डॉक्टरांकडून तपासणीची गरज भासते. बीजेडब्ल्यूएचसीच्या पेडिअ‍ॅट्रिक एण्डोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. राजेश जोशी यांनी सांगितले.

काय आहे पेडिअॅट्रिक एनईटी ?

– पेडिअॅट्रिक एनईटी हा क्वचित आढळणारा ट्युमर आहे.
– पँक्रिअॅटिक एनईटीचे प्रमाण १० लाख जणांमध्ये ०.१ हून कमी आहे
– कुशिंग सिण्ड्रोमचे दरवर्षी १० लाख जणांमागे २ ते ५ नवीन रुग्ण आढळतात, यामध्ये लहान मुलांना हा विकार होण्याचे प्रमाण केवळ १० टक्के आहे.
– न्युरोएण्डोक्राइन ट्युमर (एनईटी) या गाठी आढळण्याचे प्रमाण १ लाख प्रौढांमागे ६ असे आहे, तर बालकांमध्ये हे प्रमाण २.८ इतके आहे.
– पेडिअॅट्रिक पॅनक्रिएटिक ट्युमर्सचे (३० वर्षे वयाखालील रुग्णांमध्ये) प्रमाण अधिकच कमी आहे, दर १० लाखांमागे ०.४६ जणांमध्ये हा ट्युमर आढळतो.


हेही – ठाण्याची हवा बदलतेय..


 

First Published on: December 18, 2019 11:15 AM
Exit mobile version