आजही तुमचा कट्टर शिवसैनिक

आजही तुमचा कट्टर शिवसैनिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वतःला कट्टर शिवसैनिक असल्याचे म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना मांडताना त्यांच्या निधनाचा दिवस भारतीय राजकारणातील काळा दिवस असल्याचे म्हटले. आज 17 नोव्हेंबर आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या आयुष्यातील आणि भारतीय राजकारणातील काळा दिवस. बरोबर 7 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमच्या दैवताला देवाज्ञा झाली आणि कट्टर शिवसैनिकांबरोबर अखंड महाराष्ट्र पोरका झाला. आयुष्यामध्ये कितीही आव्हाने आली, तरी धीराने त्याचा सामना कसा करायचा, कितीही अडचणी आल्या तरी आपली मूल्ये जपून ध्येय कसे साध्य करायचे हे बाळासाहेबांनी शिकवल्याचेही नांदगावकर यांनी नमूद केले.

वाटते की आता यावे आणि तुमच्याकडे आणि तुमच्यासमोर नतमस्तक व्हावे. हे सर्व लिहीत असताना तुमच्यासोबतचा सहवासातील तो काळ डोळ्यांसमोरून जातोय. तुमच्या आठवणींनी क्षणभर डोळ्यात पाणी उभे राहते. आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत आणि तुमच्या सावलीसोबत कायम आहे आणि कायम राहील,असे नांदगावकर म्हणाले.

नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये दोघा भावांचा उल्लेख केला मात्र, त्यापुढे त्यांनी काहीच न लिहिता ते वाक्य अर्धवट सोडले. आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत आणि तुमच्या सावलीसोबत कायम आहे आणि कायम राहील. मात्र, दोघे भाऊ…असे म्हणत नांदगावकर यांनी बाळासाहेबांनी अभिवादन केले.

First Published on: November 18, 2019 1:51 AM
Exit mobile version