पुढच्या वर्षी बाप्पा येणार ११ दिवस लवकर…

पुढच्या वर्षी बाप्पा येणार ११ दिवस लवकर…

गणपती विसर्जनावेळी राज्यात १९ जाणांचा मृत्यू

अनंत चतुर्दशीला संपुर्ण राज्यातील गणेशभक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. बाप्पाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर अनंत चतुर्दशीचा दिवस कधी येतो ते कळतच नाही. यावेळी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक भाविक ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ अशी भावपुर्ण साद घालत असतो.


हेही वाचा- राज्यात बाप्पाच्या विसर्जनाची लगबग; मुंबईत १२९ ठिकाणी होणार विसर्जन

दहा दिवस मनोभावे पुजल्या नंतर बाप्पाची पाठवणी करणं खरतर प्रत्येकालाच अवघड जाते. बाप्पाला आज निरोप देताना नक्कीच सगळ्यांचे डोळे पाणावतात यात शंकाच नाही. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान लहानग्यांसह मोठे देखील ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… ‘ अशा जयघोषात बाप्पाला निरोप देत आहे. मात्र बाप्पा खरोखरंच पुढच्या वर्षी लवकर येणार आहे. कारण, पुढल्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.


हेही वाचा- बाप्पांच्या मूर्तीला धक्का लागल्यास प्रशासन जबाबदार!

पुढच्या वर्षी शनिवारी २२ ऑगस्ट, २०२० रोजी गणेश चतुर्थी येत असल्याने बाप्पा लवकरच आपल्या लाडक्या भक्तांना  भेटायला येणार आहे. या वर्षाप्रमाणे पुढच्या वर्षी देखील बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांकडे ११ दिवस मुक्काम करणार आहे. तर गौरींचे आगमन २५ ऑगस्टला होणार असून २०२० मध्ये अनंत चतुर्दशी १ सप्टेंबरला असून बाप्पाचे विसर्जन या दिवशी होईल.

First Published on: September 12, 2019 11:07 AM
Exit mobile version