बीकॉम सत्र ५ सह मुंबई विद्यापिठाने केले ९ निकाल जाहीर

बीकॉम सत्र ५ सह मुंबई विद्यापिठाने केले ९ निकाल जाहीर

विद्यापीठ अनुदान आयोगाचे संकेत

मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या बीकॉम (अकाऊटिंग व फायनान्स) सत्र ५ चा निकाल जाहीर केला आहे. या निकालाबरोबरच आज, मंगळवारी विद्यापीठाने एकूण ९ निकाल जाहीर केले आहेत. बीकॉम (अकाऊटिंग व फायनान्स) सत्र ५ च्या परीक्षेत ९ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर ९ हजार ६८४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील ७ हजार ९३८ विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार ६९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ८२.४४ % एवढी आहे. आजपर्यंत विद्यापीठाने ३३१ निकाल जाहीर केले आहेत. या बाबतची माहिती परीक्षा भवनमधील उपकुलसचिव जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.

५७,७५६ उत्तरपत्रिका आणि ८०८ शिक्षक

या परीक्षेमध्ये ५७ हजार ७५६ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले. या उत्तरपत्रिका ८०८ शिक्षकांनी तपासल्या आहेत व यातील २० हजार ५०६ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले.

तब्बल ९ निकाल जाहीर

First Published on: March 26, 2019 10:18 PM
Exit mobile version