दुष्काळाशी दोन हात करण्याचा बीडकरांचा निर्धार

दुष्काळाशी दोन हात करण्याचा बीडकरांचा निर्धार

बीड जिल्ह्यातले त्यांचे गाव मांडवखेल नावाचे, या गावाने सुकाळ कधी पाहिलाच नाही. कमीआधिक फरकाने जिल्ह्यातल्या अनेक गावांची स्थिती अशीच आहे. पण पाणी फाऊंडेशनने गावांगावांमध्ये केलेल्या जलसंधारणाने गावे पाणीदार झाली. पण या निमित्ताने ठाणे, मुंबई आणि डोंबिवलीकरांनी केलेल्या श्रमदानाने गावातील ग्रामस्थांचे आणि महानगरातील नागरिकांची मनांची सोयरिक जमली. रविवारी ठाण्यात जमलेल्या बीडकर आणि ठाणेकरांनी पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार एकमुखाने केला. श्रमदानाच्या, पाण्याच्या निमित्ताने जोडलेला धागा घट्ट करण्याचा इरादाही यानिमित्ताने करण्यात आला. पाणी फाऊंडेशनचे प्रमुख सत्यजीत भटकळ, ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे यावेळी उपस्थितीत होते.

पाणी फाऊंडेशन, विवेकवादी परिवार आणि ज्ञानप्रबोधिनी या तीन संस्थांच्या सहकार्‍याने बीड जिल्ह्यातल्या गावांमध्ये एप्रिल-मे महिन्यात पाण्यासाठी श्रमदान करण्यात आले. ठाणेकर, डोंबिवलीकर आणि मुंबईकरांनी केलेल्या श्रमदानाने पाणीदार झालेल्या बीड जिल्ह्यातील मोठेवाडी, मांडावखेल, आवसगाव, भाट-शिरपूर, गुंदेवाडी या गावांमध्ये श्रमदान केले. या श्रमदानामुळे गावात करण्यात आलेल्या शोषखड्ड्यांमुळे, जलसंधारणामुळे गावात पाणी कसे आले, याची कहाणी यानिमित्ताने या गावातील कृष्णा कोळेकर, शाहू कोळेकर, संतोष कदम महादेव अप्पा कदम, रूस्तूम चौधरी, संतोष सिंगरे, गोविंद सिंगरे, तुकाराम सुुुवर्णकार, मेजर सुर्‍यवंशी, अक्षय माने, अनंत माने, राहुल व्यवहारे, झुंबर पिंपळकर यांनी ठाणेकरांशी सुसंवाद साधला.

गावात जलसंधारणाचे काम करतांना गावातले राजकारण, जलसंधारण काम करण्यासाठी गावे पाणीदार करण्यासाठी गावकर्‍यांची केलेली मनधरणी याच्या आठवणी सांगितल्या. या कामासाठी लोकवर्गणी कशी उभारली, जनमत तयार केले. याच्या रोचक कहाण्या ग्रामस्थांनी सांगितल्या. श्रमदानाच्या कामामुळे जोडलेला स्नेह यापुढे कायम ठेवा, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले. या ग्रामस्थांशी ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे यांनी सुसंवाद साधला. यावेळी विवेकवादी परिवाराचे भरत अनिखिंडी व मान्यवर उपस्थितीत होते.

First Published on: December 5, 2019 1:28 AM
Exit mobile version