सुणावणीपूर्वी सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

सुणावणीपूर्वी सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

सुणावणीपूर्वी सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

कोरोना काळात केलेल्या मदतीमुळे अभिनेता सोनू सूद अनेकांच्या मनावर राज करत आहे. परंतु काही दिवसांपासून सोनू सूद वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे. अवैध बांधकाप्रकरणी उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीमुळे अभिनेता सोनू सूद चर्चेत आला आहे. आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचे समजते आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचीही सोनू सूदसोबत भेट झाली होती. मुंबई महापालिकेने सोनू सूद विरोधात जूहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे सोनू सूद पुन्हा चर्चेत आला आहे.

अवैध बांधकामप्रकरणी उच्चन्यायालयात धाव

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने सोनू सूदविरोधात जूहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुंबई महापालिकेने केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सोनू सूद यांच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. अशी तक्रार मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेच्या या तक्रारीला सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला १३ जानेवारीपर्यंत सोनू सूदविरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. याच प्रकरणावर उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सूनावणीपूर्वीच सोनू सूदने शरद पवारांची भेट घेतली असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिकेची तक्रार काय

मुंबई महापालिकेने म्हटले आहे की सोनू सूदने स्वतःच्या जमिनीच्या वापरात मोठा बदल केला आहे. त्यांनी आपल्या निश्चित योजनेत बदल करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केले असल्याचे बीएसमीचे म्हणणे आहे. तसेच या बांधकामासाठी संबंधित विभागाकडून परवनगीही घेतली नाही. वारंवार पाठवलेल्या नोटीसकडे सोनू सूदने दुर्लक्ष केले असल्याचेही बीएमसीने म्हटले आहे. नोटीस पाठवूनही बांधकाम थांबवले नाही. यामुळे मुंबई महापालिकेने महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

First Published on: January 13, 2021 12:13 PM
Exit mobile version