आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात एल्गार

आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात एल्गार

बेस्ट बस प्रशासन

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून आज आझाद मैदानात एल्गार पुकारला आहे. बेस्ट कृती समितीने राणीबाग ते मंत्रालयादरम्यान मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकराने याची परवानगी नाकारली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानातच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बेस्ट कृती समितीचे शिष्टमंडळ आपले निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे.

महापालिका अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही. याच मागण्यांसाठी आज मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ‘बेस्ट’ कर्मचारी संघटनांनी दिला होता. मात्र परवानणी नाकारल्याने आझाद मैदानावर आज दुपारी ३ वाजता आझाद मैदानात कर्मचारी जमतील, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.

गेल्या काही काळापासून बेस्ट परिवहन विभागाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागल आहे. परंतु महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी व कमी व्याजात कर्ज देऊ करत आर्थिक आधार दिला. असे असतानाही बेस्टच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात विद्युत विभागही तोटय़ात जाणार असल्याचे दाखविण्यात आले. सध्या बेस्ट प्रशासन भाडेतत्त्वावर बसगाड्या घेऊन खासगी पद्धतीने कारभार चालवत आहे. त्यामुळे महानगपालिकेची जबाबदारी असणाऱ्या बेस्ट परिवहन विभागाला पालिकेने सावरणे गरजेचे आहे. मात्र पालिकेकडून बेस्ट कृतीसमितीच्या मागण्या अमान्य होत आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा- CoronaVirus: चेंबूर ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट; BMC ने दिला इशारा

 

First Published on: February 17, 2021 11:41 AM
Exit mobile version