LockDown: प्रवाशांना बेस्ट हेल्पलाईनची मदत; दररोज शेकडो तक्रारींचे निवारण

LockDown: प्रवाशांना बेस्ट हेल्पलाईनची मदत; दररोज शेकडो तक्रारींचे निवारण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेसह सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बसेस धावत होत्या. आता सर्व सामान्य प्रवाशांसाठी सुद्धा बेस्टचा बसेस सुरु झालेल्या आहे. मात्र सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन बंद असल्याने, सामान्य प्रवाशांना परवडणारे साधन म्हणून बेस्टकडे प्रवासी वळले आहे. मात्र अनेक प्रवाशांना बेस्टचा प्रवास करताना बसेसची माहिती मिळत नाही. त्यामुळे बसेसची माहिती करिता बेस्टचा हेल्प-लाईनवर प्रवाशांचे शेकडो कॉल येणे सुरु झाले. बेस्ट प्रशासनाकडून सुद्धा प्रवाशांना योग्य बसेसची माहिती मिळत आहे. त्यामुळे बेस्टची हेल्पलाईन या कोरोनाचा संकटकाळातसुद्धा प्रवाशांसाठी बेस्ट ठरली आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे कोरोनाचा संसर्ग पसरू नये, याकरता झटणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यापासून विशेष बसफेऱ्या सुरू केल्या. मुंबईसह इतर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसफेऱ्या चालविल्या जात होत्या. उपक्रमाने शुक्रवारपासून त्या सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू केलेले अतिरिक्त मार्ग बंद केल्याने इतर सर्व सामान्य प्रवाशांसाठी बसच्या अधिक फेऱ्या वाढल्या आहे. त्यामुळे बस प्रवाशांची संख्या वाढली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी चालवण्यात येणाऱ्या फेऱ्यांची संख्या दैनंदिन स्तरावर साधारण १८०० पर्यंत होती. ती संख्या आता २ हजार ७८६ पर्यंत पोहोचली आहे. सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद असल्याने आता प्रवाशांनी आपला मोर्चा बेस्ट बसेसकडे वळवला आहे. यात अनेक प्रवाशांना बेस्ट बसेसच्या नंबरची माहिती नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहे. बेस्टचा वाहतूक विभागाने प्रवाशांसाठी सुरु केलेल्या 1800227550 या हेल्पलाईनवर गेल्या काही दिवसात शेकडो कॉल आले आहे. ज्यात बेस्टकडून बस प्रवाशांचे समाधान करण्यात येत आहे. लॉकडाऊन पूर्वी साधारणता प्रत्येक दिवशी १५० तक्रारी येत होत्या. ज्यात बेस्टचा विद्युत विभागाचा तक्रारीसुद्धा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून बेस्ट बसेसचा मार्गाविषयी माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांचे शेकडो फोन येत आहे.

बेस्टचे विद्युत ग्राहक आणि प्रवाशांना बेस्टची अखंडित सेवा मिळावी त्यासाठी बेस्ट उपक्रम सदैव तत्पर असते. या करोना काळात बेस्टची बस सेवा सुरु आहे. सध्या कोरोनाच्या या काळात सामान्य प्रवाशांना परवडणारे साधन म्हणून बेस्टकडे प्रवासी मोठ्या प्रमाणात वळले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचा हेल्पलाईन नंबरवर ही दररोज प्रवाशांचे अनेक कॉल बसेसचा माहितीसाठी येत आहे. त्यांना आपण योग्य माहिती देऊन त्यांची मदत करत आहे.
– मनोज वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम

हेल्पलाईन २४/७ सुरुच

बेस्टच्या विद्युत विभाग आणि वाहतूक विभागासाठी दोन हेल्पलाइन नंबर आहेत. या दोन्ही हेल्पलाईन २४/७ सुरु असते. बेस्टचे कर्मचारी एकूण तीन शिप्टमध्ये प्रवाशांचा मदतीसाठी काम करतात. लॉकडाऊन काळात यांच्यावर मोठी जबादारी होती. कारण लॉकडाऊन काळात विद्युत विभागातील कर्मचारी आपली अखंडित सेवा देत होते. अनेकदा वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर विद्युत ग्राहकांचा तक्रारी येत होत्या. तरी सुद्धा वाहतूक विभागातील हेल्पलाईन त्यांच्या तक्रारींचे लगेच विद्युत विभागाकडे वळवून ग्राहकांचा तक्रारींचे निवारण करत होते. गेल्या काही दिवसापासून वाहतूक विभागा विषयी सर्वाधिक तक्रारी येत असल्या तरी त्यांचे समाधान सुद्धा लगेच बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा –

कल्याण डोंबिवलीची परिस्थिती आठवडाभरात न सुधारल्यास भाजप उग्र आंदोलन छेडणार

First Published on: June 23, 2020 6:58 PM
Exit mobile version