बेस्ट वाढवणार चार्जिंग स्टेशनचे जाळे

बेस्ट वाढवणार चार्जिंग स्टेशनचे जाळे

बेस्ट उपक्रमात येत्या दिवसांमध्ये येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पाहता उपक्रमाने आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क येत्या दिवसांमध्ये उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात इलेक्ट्रिक बसेसच्या गरजेनुसार आता हे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. नुकत्याच बेस्ट उपक्रमाकडून ४० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आल्या. त्यासाठी धारावी आगारात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.

याठिकाणी बसेसची चार्जिंग करण्यात येणार आहे. आतापर्यंत बॅकबे आगार आणि प्रभादेवी अशा दोन ठिकाणीच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे. त्याठिकाणी खाजगी वाहनांनाही चार्जिंगची सुविधा आहे. तसेच बेस्ट बसेसही चार्जिंग करण्याची सुविधा आहे. त्यामध्ये आता धारावीच्या चार्जिंग स्टेशनचीही आता भर पडलेली आहे. बेस्टच्या ताफ्यात येणार्‍या बसेसच्या संख्येनुसार प्रत्येक बस आगारासाठी बस देण्यात येतील. त्यानुसार बेस्ट चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्यामुळे बस आगारांची निवड होईल, त्यानुसार चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील अशी माहिती बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

सध्या बेस्ट उपक्रमाच्या सहा इलेक्ट्रिक बसेस मुंबईभर धावतात. १.२ किलोमीटरसाठी बेस्टच बसला १ लिटर डिझेल लागते. त्यासाठी 70 रूपये खर्च येतो. तर इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी ८.२८ रूपये इतका खर्च येतो. त्यामुळे डिझेल, पेट्रोलच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर इंधनाची आणि पैशाची बचत होणे शक्य आहे. बसच्या तुलनेत छोट्या वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी आणखी फायदा होणे शक्य आहे. सध्या २०० किलोमीटर अंतर कापले जाईल इतक्या क्षमतेच्या बॅटरीसह कार आणि बसचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे.

First Published on: September 18, 2019 5:51 AM
Exit mobile version