आयपीएलवर बेटींग लावणाऱ्या दोन बुकींना अटक

आयपीएलवर बेटींग लावणाऱ्या दोन बुकींना अटक

माहिम येथील ज्वेलर्स लूटप्रकरण; मुद्देमालासह २ जणांना अटक

आयपीएल सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेणार्‍या दोन बुकींना बुधवारी सायंकाळी जुहू येथील एका हॉटेलमधून वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रुषी कन्हैय्यालाल दरीयानानी आणि महेश हिरो खेमलानी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने सोमवार ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

७ लाखांचा मुद्देमाल जप्त 

दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल, दोन लॅपटॉप, एक नोटबुक, रुमसंदर्भातील कागदपत्रे, दोन पासपोर्ट, विविध बँकांचे डेबीट, एटीएम आणि क्रेडिट कार्ड, मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनशॉटच्या प्रिंट, भारतीय चलनातील नोटा, हाँगकाँग आणि अमेरिकन डॉलर्स असा ६ लाख ९४ हजार ९९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांत तिघांना आरोपी दाखविण्यात आले असून त्यात मनोज, राजीव आणि नितेश यांचा समावेश आहे. अंधेरीतील झेड लक्झरी रेसीडन्सी हॉटेलमध्ये काही बुकी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यांवर मोबाईल फोनच्या सहाय्याने बेटींग घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अशी केली कारवाई 

बुधवारी सायंकाळी अंधेरीतील जुहू, आयरीस पार्कसमोरील देवळे रोड, झेड लक्झरी रेसीडन्सी हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक ३०९ मध्ये छापा टाकला होता. यावेळी फ्लॅटमध्ये दोनजण टिव्ही मॅच पाहून मोबाईल फोनवरुन ऑनलाईन बेटींग घेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळाहून पोलिसांनी मोबाईलसह लॅपटॉप, भारतीय आणि विदेशी चलन आदी मुद्देमाल जप्त केला होता. चौकशीअंती या दोघांची नावे रुषी दरीयानानी आणि महेश खेमलानी असल्याचे उघडकीस आले. दोघेही व्यवसायाने व्यापारी असून वांद्रे आणि अंधेरी परिसरात राहतात. त्यांच्या चौकशीत ते दोघेही एका संकेतस्थळावरील लिंक आणि पासवर्डच्या मदतीने जबलपूर येथील मनोजर, कोलकाता येथील राजीव यांच्या मदतीने ऑनलाईन बेटींग घेत होते. यातील काही व्यवहार रोखीने होत असून तो व्यवहार ते मनोज आणि राजीव यांच्या मदतीने करीत होते.

असे लावत होते बेटींग 

याकामी त्यांना बेटींगमधील काही रक्कमेचा हिस्सा मिळणार होता. इंटरनेट वेबसाईटची लिंक आणि पासपोर्ट त्याला त्याचा भाऊ नितेश खेमलानी यांच्याकडून मिळाली होती. त्याचा भाऊ निलेश हादेखील बेटींग घेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडील चार सिमकार्डपैकी दोन सिमकार्ड त्यांच्या नावावर होते तर दोन सिमकार्ड त्यांनी बेटींगसाठी घेतले होते. या दोघांनी हॉटेलमध्ये सहा दिवसांसाठी रुम बुक करताना चाळीस हजार रुपये दिले होते. या दोघांविरुद्ध गुन्ह्या दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: May 2, 2019 8:51 PM
Exit mobile version