WhatsAppवर इंग्रजी, अरबी आणि उर्दू भाषेत पत्नीला दिला तीन वेळा तलाक!

WhatsAppवर इंग्रजी, अरबी आणि उर्दू भाषेत पत्नीला दिला तीन वेळा तलाक!

हलालासाठी AIMIM च्या नेत्याचा पूर्व पत्नीवर दबाव, ९ वर्षांनी मित्रासह पोहचले घरी

भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत फातमानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पत्नीला तीन वेळा विविध भाषेत तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फातमानगर, नागांव येथे राहणारी हुमाबानो मोहम्मद जुनेद अंसारी (३०) ही आमपाड़ा चाविंद्रा येथील माहेरी राहत असताना पती जुनेद मोहम्मद यासीन अंसारी (३३) याने घरी जाऊन २३ मार्च रोजी बेदम मारहाण केली. तिला घरातून बाहेर काढले. त्यानंतर पती जुनेद अंसारी याने ७ सप्टेंबरला WhatsAppवर इंग्रजी भाषेमध्ये तीनवेळा लिहून तलाक लिहून मेसेज केला. तर १० सप्टेंबरला अरबी भाषेमध्ये तलाक लिहून WhatsAppवर पुन्हा तलाकचा मेसेज पाठवला. त्यानंतर १२ सप्टेंबरला उर्दू भाषेत पुन्हा WhatsAppवर मेसेज करून तीन विविध भाषांमध्ये तीन तलाक दिला आहे. त्यामुळे पत्नी हुमाबानो हिने या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात पती जुनेद अंसारी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) एच.एस.चिरमाड़े या तीन तलाकच्या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

First Published on: October 2, 2020 9:12 PM
Exit mobile version